*भाजप हा कार्यकत्यांचा पक्ष - आमदार अभिमन्यू पवार*
नूतन भाजप किसान मोर्चा व युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप..
औसा - (मन्नान मनियारी)भाजप हा कार्यकत्यांचा पक्ष आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने पक्ष वाढीसाठी काम केले पाहिजे. प्रखर राष्ट्रवाद या विचाराला घेवून जाणारा भाजप हा पक्ष असून सामन्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना न्याय देणारा हा केडर बेस पक्ष आहे.बाकी सर्व पक्ष वैयक्तिक मालकीचे आहेत.असे मत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.१२ जून रोजी औसा येथील आयोजित भाजप किसान मोर्चा व भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी निवडीचे पत्र देताना उपस्थित कार्यकर्त्यां समोर व्यक्त केले.
या निवडीच्या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,सुशीलदादा बाजपाई,पंचायत समिती सदस्य दिपक चाबुकस्वार,संतोषअप्पा मुक्ता, अॅड. अरविंद कुलकर्णी,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिपक परशने,भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.यावेळी आमदार अभिमन्यू पवार बोलत होते की शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल करणारी पोखरा योजना आणली मात्र हि योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली.जलयुक्त शिवार हि महत्वाकांक्षी योजना देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावीपणे राबवून मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता कमी झाली.असे सांगून प्रामाणिक कार्यकर्त्यांना भाजप पक्षात योग्य न्याय दिला जातो.पक्ष वाढीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागात पक्षाने केलेल्या कामाची माहिती पोहचवून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करावे असे सांगून येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणूकीसाठी पक्ष बांधणी करण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना आ. अभिमन्यू पवार यांनी केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.