सेवाभाव,मित्रता,बंधूप्रेम तथा सामाजिक सलोखा जपणारे अवलिया-मा.संजयजी सगरे सर









*सेवाभाव,मित्रता,बंधूप्रेम तथा सामाजिक सलोखा जपणारे अवलिया-मा.संजयजी सगरे सर*
आयुष्यात जिवन जगताना अनेक माणसे भेटत असतात त्यात कांही सदैव अठवणीत राहतात ते त्यांच्या स्वभावाने,त्यातीलच एक हिरा म्हणजे संजय सगरे सर.माझ्या शालेय जीवनापासून मी सरांच्या संपर्कात.सरांनी आम्हाला शालेय जीवनात हि मोलाचे मार्गदर्शन केले असून आजही आम्ही सरांच्या मार्गदर्शनावर चालत आहोत.संजू सरांचे माझ्या परिवाराशीही जिव्हाळ्याचे संबंध असून माझे बंधू डा.आर.आर.शेख हे सरांचे खूप चांगले मित्र असून संजू सरांचे शैक्षणिक कार्या बरोबर सामाजिक क्षेत्रातील योगदान ही मोठे आहे.सरांनी सामाजिक चळवळीला गतिमान करण्यासाठी परिश्रम घेऊन,सामाजिक बांधिलकी जपत,तसेच तळागळातील मुले शिकली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करुन,त्यांच्या अडी-अडचणीच्या काळात साथ देवून सामाजिक भान न भटकू देता,वेळेला धाऊन येणारा सच्चा गुरू म्हणजे संजय सर.तसेच पत्रकारीता आणि लेखन या ही आवडीच्या क्षेत्रात उत्तम कार्य करून आपलं नाव याही क्षेत्रात कोरून आपली वेगळी ओळख निर्माण करून संजय सरांनी वेगळी छाप पाडली आहे.सर आपल्या कर्तव्यनिष्ठेने शिक्षण व पत्रकारीतेच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचले आहेत.अशा महान व कर्तबगार व्यक्तीमत्वाला माझा सलाम.आज सरांचा वाढदिवस,सरांबद्दल कांहितरी लिहावे असे वाटले पण सरांप्रती लिखान करताना माझे हे चार शब्द सुध्दा अपूरे पडतील.कारण सर हे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व,दिलदार,हसमुख,अभ्यासू पत्रकार,अडीअडचणीत सर्वांना सहकार्य करणारे,सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे,सतत मार्गदर्शन करणारे माझे गुरूवर्य,दै.एकमतचे औसा तालुका प्रतिनिधी,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय *मा.संजय सगरे* सरांना उत्तम व निरोगी आयुष्यासाठी व भविष्यातील उत्तरोत्तर प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🍁
आपलाच-
*ॲड.इकबाल रसूलसाब शेख*
-राहत,गणेश नगर,औसा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या