कुंभार समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी संतोष कुंभार यांची निवड






कुंभार समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी संतोष कुंभार यांची निवड
लातूर (प्रतिनिधी):-कुंभार समाज सामाजिक संस्था अध्यक्ष सतिष दरेकर यांनी महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या युवा आघाडीचची कार्यकारणी नुकतीच घोषित केली असून त्यात लातूर येथील व्यावसायिक संतोष कुंभार यांची कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
      प्रदेश कार्यकारणीने संतोष कुंभार यांची निवड घोषित करण्यात आल्यानंतर त्यांनी कुंभार समाज संघटना बांधणीचे काम जोमाने करण्याचा संकल्प केला असून त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली असल्यामुळे कुंभार समाज सामाजिक संस्था युवा आघाडी महाराष्ट्राने त्यांची दखल घेऊन कुंभार समाजाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी संतोष कुंभार यांची निवड केली आहे. त्याच बरोबर. विभागीय अध्यक्ष म्हणून अमोल घुमाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची  निवड लातूर जिल्ह्याच्या शिफारशी करून करण्यात आल्या आहेत. त्याच्या सोबत संघटक म्हणून बबन राजे,सरचिटणीस गुरुनाथ मोहळकर आणि चंद्रकांत टोलेजेंग याची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुंभार समाज सामाजिक संस्था,जिल्हाध्यक्ष अँड.वैजनाथ कुंभार,सरचिटणीस राजकुमार राजारूपे,कार्यध्यक्ष दिलीप मोहळकर,संघटक विलास कोतापुरे, कोअर कमिटीचे प्रमुख ज्ञानोबा पाचापुरे,मार्गदर्शक महादेव कानगुले,त्र्यंबक कुंभार,लिंबराज पन्हाळकर, तुकाराम किवळीकर यानी आभार व्यक्त केले आहेत. संतोष कुंभार यांच्या निवड झाल्यामुळे लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कुंभार संघटना बळकट करण्याची भावना व्यक्त केली.व समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करण्यात येईल असेही संतोष कुंभार यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या