सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी
सी.बी.आई.कडून चौकशी करावी - राजपूत करणी सेना
लातूर / प्रतिनिधी ः विख्यात बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांनी 15 जून 2020 रोजी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त विविध माध्यमांवर प्रसिध्द झाले. सुशांतसिंह राजपूत हा बिहारमधील छोट्याशा गावातून मुंबई येथे येऊन आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड क्षेत्रात आपले शून्यातून विश्व निर्माण केलेले होते. सुशांत एक होतकरुन व कष्टाळू कलाकार होता. चित्रपट सृष्टीमध्ये अतिशय बिकट परिस्थितून ओळख निर्माण सर्व प्रकारची यशोशिखरे प्राप्त केलेल्या सुशांतचे यश हे इतरांच्या डोळ्यात खुपणारे असावे त्यामुळे त्याच्या नावलौकिकावर जळफळाट झालेल्यांकडून त्यांची हत्या केली असावी अशी शंका घेतली जात आहे. त्यामुळे लातूर येथील श्री राजपूत करणी सेना या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूची सी.बी.आई. तपास यंत्रणेकडून चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अल्पावधीत चित्रपट जगतात प्रचंड यश संपादन करणार्या सुशांतला असंख्य शत्रु असने नाकारता येत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृतदेहाचे मिळणार्या फोटोंवरुन त्याने स्वतःहून गळफास घेतल्याचे निदर्शनास येत नाही. सर्रासपणे गळफास घेतल्यानंतरची कोणतीच लक्षणे त्याच्या मृतदेहावर दिसत नव्हती. जसे की, जिभ बाहेर येणे, डोळे मोठे होऊन बाहेर येण्याचा प्रकार अजिबात नव्हता. त्याशिवाय गळ्याभोवती विशिष्ठ आकाराचा वळ उमटल्याने सुशांतसिंहची ही आत्महत्या नसून ती हत्याच असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सी.बी.आई.कडून चौकशी करावी अशी मुख्यमंत्र्यांना मागणी करणारे निवेदन लातूर येथे श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी या निवेदनावर राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्रसिंह चौहान, बी.एस. ठाकूर लातूर शहर जिल्हाध्यक्ष, जितेंद्रसिंह ठाकूर, जगदिशसिंह चौहान, औसा शहराध्यक्ष, राहूलसिंह राजपूत, लातूर जिल्हाध्यक्ष, रोहित राजपूत, अलताफ पठाण, शैलेंद्रसिंह तिवारी, बजरंगलाल आवस्थी आदींच्या स्वाक्षर्या होत्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.