एमपीएससीच्या निकालावरून मुस्लिम आरक्षण द्या- अब्दुल समद शेख
लातूर/प्रतिनिधी ः 2019 च्या एमपीएससीच्या च्या निकालावरून मुस्लिम आरक्षण कीती गरजेचे आहे हे दिसून येते. एमपीएससीचा निकाल लागला, सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. मुस्लिम समाजातील 4 विद्यार्थी यशस्वी झाले त्यांचे सुद्धा अभिनंदन.. केवळ एक मुलगी उपजिल्हाधिकारी झाली तीचे कौतुक मला सुद्धा आहे पण या आनंदात धुंद होण्यापूर्वी खालील आकडेवारी बघा.
एकूण जागा : 420
मुस्लिम समाजातील यशस्वी झालेले विद्यार्थी : 4 ( 3 मुली, 1 मुलगा )
टक्केवारी : 0.95% ( एक टक्का सुद्धा नाही )
महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची लोकसंख्येनुसार टक्केवारी : 11-12%
मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि शासकीय नोकर्यांमध्ये आरक्षणाची किती गरज आहे हे दाखवण्यासाठी वरील आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. शिक्षण आणि शासकीय नोकर्यांमध्ये मुस्लिम समाजाच्या मुलांची किती वाताहत झाली आहे हे यातून सिध्द होते.म्हणून मुस्लिम विकास परिषद संघटनेचे ध्येय व उद्दिष्ट या विचाराने एक चळवळीतून तयार झालेला लढा आहे तो समाजाने हस्तगत करावा, चळवळीत शासनास मागणी करावी. मुस्लिम समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हक्कासाठी लढा देण्याची गरज आहे. आघाडी शासन विचारधन आहे पण समाजानेही पुढे येण्याची गरज आहे, म्हणतात ना की माँ भी अपने बच्चे को दुध नहीं पिलाती जबतक वह रोता नहीं तेव्हा आता तरी जागे व्हा ? महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी अब्दुल समद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शासनास केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.