न वापलेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व खत कृषी विभागाने उपलब्ध करून द्या.एम आय एम ची मागणी






न वापलेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व खत कृषी विभागाने उपलब्ध करून द्या.एम आय एम ची मागणी
औसा=मुख्तार मणियार
लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील न वापलेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खत कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी एम आय एम व शेतकऱ्यांच्य वतीने औसा तहसिलदार मार्फत निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांना आज दिनांक 26जुन2020 शुक्रवार रोजी देण्यात आले.या निवेदनात त्यांनी लिहिले आहे लातूर जिल्ह्यातील तसेच औसा तालुक्यातील ब-याच शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे उगवण क्षमता नसल्याने सोयाबीनच्या पिकावर संकट आल्याने व दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने याबाबत तालुक्यातील प्रत्येक मंडळ विभागामार्फत न वापलेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे त्वरित करून शासन स्तरावर मदत जाहीर करावी व तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांवर उभे असलेले दुबार पेरणीचे संकटास कृषी खात्यामार्फत बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे.या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना एम आय एम चे सय्यद मुजफ्फर अली इनामदार,अॅड. गफुरूल्ला हाशमी, सय्यद कलीम,नियामत लोहारे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या