दाती, डोंगरकडा कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त
हिंगोली, दि. 26 :-इमामोद्दीन इशाती
कळमनुरी तालुक्यातील दाती, डोंगरकडा-बौध्दवाडा येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आले होते. या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून दाती, डोंगरकडा-बौध्दवाडा हे क्षेत्र कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या भागाचे दि. 12 जून, 2020 रोजी सर्वेक्षण करण्यात आले होते. यावेळी दाती येथील एकूण 376 घराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1745 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. तसेच डोंगरकडा-बौध्दवाडा येथील 150 घराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 575 व्यक्तीची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये संशयित अथवा कोरोनाची लक्षणे असलेली (सर्दी, ताप व खोकला) व्यक्ती आढळून आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात नमूद करुन हे क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.
वरील घोषित केलेल्या कंटोनमेंट झोनचा कालावधी दि. 25 जून, 2020 रोजी संपल्यामुळे या परिसरातील व्यक्तीसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रतिबंधमुक्त केले आहेत.
*****
वसमत येथील कुरेशी मोहल्ला कंटोनमेंट झोन प्रतिबंधमुक्त
हिंगोली, दि. 26 :- वसमत येथील कुरेशी मोहल्ला येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आले होते. या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून वसमत नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधील कुरेशी मोहल्ला हे क्षेत्र कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या भागाचे दि. 11 जून, 2020 रोजी सर्वेक्षण करुन 485 घराची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 2492 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये संशयित अथवा कोरोनाची लक्षणे असलेली (सर्दी, ताप व खोकला) व्यक्ती आढळून आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवालात नमूद करुन हे क्षेत्र प्रतिबंधमुक्त करण्याची शिफारस केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.