जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी कोविड-19 च्या
रूग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा निर्माण कराव्यात
शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळवुन देऊ
लातूर जिल्ह्यात हे दिवसेंदिवस कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने जिल्हयातील रूग्णालयात अतिरीक्त बेडची व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. त्या दृष्टीने सध्या बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी कमी असली तरी भविष्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे असलेल्या बेडच्या संख्येनुसार काही बेड कोरोना रुग्ण उपचारासाठी राखीव ठेवावेत व रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात असे आववाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोवीडच्या अनुषंगाने तसेच खासगी रुग्णालयातून कोविंड रुग्णावर उपचार सुरू करण्याबाबतच्या आढावा बैठकीस यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, IMA चे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्यासह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.
आपण सर्वजण सुरुवातीपासूनच covid-19 याविरोधात लढा देत आहोत. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तरी लातूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी व खाजगी डॉक्टरांनी कोविड रुग्णावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल व काही अडचणी असतील तर त्या त्वरित सोडविल्या जातील, अशी ग्वाहीही यावेळी दिली.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.