औसा येथील कोव्हीड सेंटर चे श्रेणीवर्धन करून डेडीकेटेड कोव्हीड सेंटर तयार करून मनुष्यबळासह सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात!* आ अभिमन्यु पवार
औसा मुख्तार मणियार
औसा शहरासह तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे त्यामुळे औसा येथील कोव्हीड सेंटर चे श्रेणीवर्धन करून डेडीकेटेड कोव्हीड सेंटर तयार करण्यात यावे अशी मागणी लातूरचे जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत यांच्याकडे केली आहे.
डेडीकेटेड कोव्हीड सेंटर मध्ये समुपदेशक, एमबीबीएस व आयुर्वेदिक डॉक्टर्स पूर्णवेळ उपलब्ध करून द्यावेत,, आवश्यक बेड्स, मेडिसिन्स, १०८ क्रमांकाची रूग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात यावे तसेच मधुमेह/उच्च रक्तदाब/इतर दुर्धर आजार असलेल्या कोरोना बाधित रूग्णांवर औसा ऐवजी लातूर येथे उपचार करण्यात यावे अशा मागण्याही निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयांकडे केल्या आहेत

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.