पाटबंधारे उपविभाग क्र.3 येथे कार्यरत श्रीमती के. जी. हांडे यांना सेवानिवृत्तीबद्दल भावपूर्ण निरोप
लातूर : जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड कार्यालय उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग क्र.3 लातूर येथे कार्यरत असलेल्या श्रीमती कांताबाई जिजाभाऊ हांडे या मंगळवार, 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल श्री विठ्ठलाची प्रतीमा भेट देवून उपकार्यकारी अभियंता योगीराज माने, उपविभागीय अधिकारी सुधाकर कोंगे व शाखा अभियंता नितीन पाटील, श्रीमती अलका लोंढे, स्वाती तपसे यांच्या हस्ते सत्कार करुन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
याप्रसंगी शशीकांत जाधव, मोहन हिप्परगे महाराज, जयकुमार जोशी, सोनकांबळे, जाधव यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.