आमदार अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांने साजरा..
औसा - औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १ जुलै रोजी कार्यकर्त्यांनी मतदारसंघात विविध उपक्रमांने हा वाढदिवस साजरा करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळात निर्माण होणाऱ्या रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबीरे,वृक्ष लागवड, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोळ्या,मास्क व सॅनिटायझर चे वाटप,गरजूवंताना शिधावाटप अशा विविध उपक्रमांने हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित औसा येथील विजय मंगल कार्यालयात व किल्लारी, कासारसिरसी येथील रक्तदान शिबिरात १६१ जणांनी रक्तदान केले.औसा शहरातील मुक्तेश्वर मंदिरात अभिषेक व मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.याकतपुर रोडवर वृक्षलागवड व वृक्षाला लोखंडी कुंपण लावण्यात आले.औसा शहरातील नाथनगर व स्वरस्वती नगर येथे वृक्षलागवड व औसा शहरातील खाँजापिर दर्गा येथे चादर चढवण्यात आली.याचबरोबर आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त औसा तहसील व औसा बांधकाम विभागाला अॅटोमेटिक सॅनिटायझर मशिन भेट देण्यात आली.हासेगाव येथे अकराशे वृक्षांची लागवड करण्यात आली, उजनी (ता.औसा) येथील कार्यकर्त्यांनी १ हजार वृक्षाची लागवड करण्यात आली .किल्लारी याठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .औसा विधानसभा मतदारसंघातील विविध गावात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गोळ्या व मास्क वाटप करण्यात आले.हसलगण याठिकाणी ६० गरजवंताला शिधावाटप व वृक्ष लागवड करण्यात आली. या विविध उपक्रम प्रसंगी परिक्षीत अभिमन्यू पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोषअप्पा मुक्ता,सुशीलदादा बाजपाई,सुनीलअप्पा उटगे,भिमाशंकर मिटकरी,अरविंद कुलकर्णी,कंटीअण्णा मुळे,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय परसणे, उन्मेष वाघधरे,समीर डेंग, गोपाळ धानूरे, संजय माळी, लहू कांबळे,अहमद शेख,महेश पाटील, तुराब देशमुख,काकासाहेब मोरे, दिपक चाबुकस्वार, पप्पूभाई शेख, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, लिंबराज थोरमोटे, गजेंद्र डोलारे, कल्पना डांंगे, मोहिनी पाठक,सोनाली गुळबिले, श्रध्दा कुलकर्णी, ज्योती हालकुडे,शैलेश स्वामी, दौलत वाघमारे,बालाजी चामे, हाणमंत कांबळे, प्रशांत कलमे नारायण साळुंके, दिगंबर माळी, शाहुराज डोके, अच्युत पाटील, भागवत कांबळे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.