जिल्हयात सरासरी 7.61 मि.मी. पावसाची नोंद
नदी काठावरील शेतकरी,
वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे
लातूर दि.3-(जि.मा.का.) जिल्हयात आज दिनांक 03 जूलै 2020 रोजी सकाळी 8 पर्यंत सरासरी 7.61 मिमी पावसाची नोंद झाली असून आज पर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या 29.69 टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हयात दिनांक 03 जूलै 2020 रोजी झालेले तालुका निहाय पर्जन्यमान तसेच 1 जून ते 03 जूलै 2020 पर्यंत झालेले एकूण पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. ( आकडेवारी मि.मी.मध्ये ) लातूर (1.50, 238.42) , औसा (13.43, 209.01) , रेणापूर (0.00, 249.75) ,अहमदपूर (3.83, 275.31) , चाकूर-(4.40, 179.00) , उदगीर-(6.29,238.87),जळकोट-(0.50,243.00),निलंगा-(21.13,207.07),देवणी- (22.00. 287.02) व शिरुर अनंतपाळ- (3.00, 223.01) मि.मी. आहे.
लातूर जिल्हयाची 1 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 791.60 मि.मी. असून आजपर्यंत झालेला पाऊस 235.05 मि.मी. इतका असून वार्षिक सरासरीच्या 29.69 टक्के आहे.
नदी काठावरील शेतकरी,
वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे
लातूर दि.3-(जि.मा.का.) जिल्हयातील मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदीवरील बॅरेजेसच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area ) सातत्याने पर्जन्यवृष्टी होत असल्याने येवा (Inflow) असाचा चालू राहिला तर केंव्हाही बॅरेजेस निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे बॅरेजेसमध्ये येणारा येवा बॅरेजमधून त्या त्या नदीपात्रात सोडावा लागणार आहे.
मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहिलेले नागरीक यांनी सावध रहावे जेणे करुन जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी लातूर पाटबंधारे विभाग क्र.-1 लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.