चि.विराज जयद्रथ जाधव 98.60% गुणांनी दहावी उत्तीर्ण



चि.विराज जयद्रथ जाधव
98.60% गुणांनी दहावी उत्तीर्ण..

       लातूर: विराज जयद्रथ जाधव  या विद्यार्थ्यांने नियमित आणि सूत्रबद्ध अभ्यासाचे वर्षभर नियोजन करून दहावी परीक्षेत 98.60% गुण मिळवले आहेत.अभ्यासाचे कसलाही ताण- तणाव न घेता नियमित अभ्यास करून विषयाच्या संकल्पना समजून घेतल्या होत्या.त्यामुळे त्याला अभ्यासाचे टेन्शन कधी वाटले नाही, असे तो म्हणतो.विराज हा श्री केशवराज विद्यालय, लातूर शाळेचा विद्यार्थी आहे.वर्षभर शाळेत शिक्षकांनी दिलेला अभ्यास आणि आई- वडिलांचे मार्गदर्शनातून दररोज सहा तास अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.
     विराजच्या या यशाबद्दल वर्ग शिक्षक श्री बबन गायकवाड सर,वडील डॉ.जयद्रथ जाधव,आई सौ.स्नेहल जाधव, बहीण इंजि.क्षितीजा जाधव,आजोबा श्री सुभाषराव जाधव,आजीसौ.विमलबाई जाधव,काका पृथ्वीराज, गणेश व दत्तात्रय जाधव यांच्यासह काकू, आत्या- मावश्या तसेच डॉ.सतीश यादव, उपप्राचार्य डॉ.सुरेश नांदे, डॉ.आर.सी.जाधव, डॉ.पवार एस.एस. डॉ.शेख एम.आय. मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या