प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ मिळावे शेतकरी संघटनेने केले लाक्षणिक उपोषण




प्रोत्साहनपर अनुदान 
तात्काळ मिळावे 

शेतकरी संघटनेने केले 
लाक्षणिक उपोषण 

लातूर: कर्जमाफीची घोषणा करताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. हे अनुदान अद्याप जमा झालेले नसून ते तात्काळ द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले.
 या निवेदनात म्हटले आहे की,राज्य शासनाने कर्जमाफी योजना जाहीर करताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे जाहीर केले होते.हे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. राज्यातील सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. समाजातील विविध घटकांना वेळोवेळी साहाय्य करण्याचे काम केले जात आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात सरकार खंबीरपणे काम करत आहे.        लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाचा भरणा करतात.आपली पत ठेवून अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी योगदान देतात. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना  लाभ झाला परंतु नियमित कर्जफेड करणारे अडचणीत आले. त्यामुळे लवकरात लवकर प्रोत्साहनपर अनुदान खात्यावर जमा करावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे जमावबंदी आदेश लागू असल्याने केवळ पाच जणांनी या आंदोलनात सहभाग घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बहुजन रयत परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष राजीव कसबे,दगडूसाहेब पडिले ,साहेब पाटील व मोहन चवरे यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. डिजिटल डिस्टंसिंग व मास्क बांधून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेतली नाही तर लॉकडाउनच्या अटी पाळून  राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या