महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची लातूर शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीरअध्यक्षपदी बालाजी फड, कार्याध्यक्ष हरिराम कुलकर्णी, तर सचिव शहाजी पवार




महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची
लातूर शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर
....................................
अध्यक्षपदी बालाजी फड, कार्याध्यक्ष हरिराम कुलकर्णी, तर सचिव शहाजी पवार
.....................................

लातूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई  संलग्नित लातूर शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी बालाजी फड, कार्याध्यक्ष म्हणून हरिराम कुलकर्णी व सरचिटणीसपदी शहाजी पवार यांची निवड पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभागाचे प्रभारी संघटक वैभव स्वामी यांनी जाहीर केली.



महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांची निवड निश्चित झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये पत्रकार संघाचे संघटन मजबूत करण्याचे काम युद्ध पातळीवर होत आहे. लातूर जिल्हा कार्यकारिणीची निवड साधारण चार महिन्यापूर्वी वृत्तवाहिनीचे प्रमुख मनीष केत आणि मराठवाडा विभागाचे प्रभारी संघटक वैभव स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन लातूर जिल्हाध्यक्षपदी अशोक देडे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली होती. जिल्हा कार्यकारणीच्या निवडीनंतर लातूर शहर कार्यकारिणीची निवड प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे  यांच्या आदेशावरून मराठवाडा विभागाचे प्रभारी संघटक वैभव स्वामी यांनी जाहीर केली.



सदरील कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी बालाजी फड, कार्याध्यक्षपदी हरिराम कुलकर्णी, उपाध्यक्षपदी संगम कोटलवार, सुशांत सांगवे, अफसर कारभारी, सरचिटणीसपदी शहाजी पवार, सहसरचिटणीसपदी डॉ. सितम सोनवणे,  संघटकपदी इस्माईल शेख, सहसंघटकपदी प्रा.विनोद चव्हाण, गौतम कांबळे, कोषाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव, प्रसिद्धी प्रमुखपदी सुजित नाईक, नारायण (तम्मा) पावले, तर सदस्यपदी हणमंत गायकवाड, अशपाक पठाण, श्रीराम संपते, श्रीराम जाधव, योगिराज पिसाळ, श्रीकांत धर्माधिकारी आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.

उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या