न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपयर्र्त मुख्याध्यापक अनिल कोल्हेंचे सेवानिवृत्तीचे लाभ तूर्त स्थगीत विठ्ठल भोसले यांनी केली होती तक्रार




न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपयर्र्त मुख्याध्यापक
अनिल कोल्हेंचे सेवानिवृत्तीचे लाभ तूर्त स्थगीत
विठ्ठल भोसले यांनी केली होती तक्रार
लातूर,दि.१ः मुखेड तालुक्यातील जांब बु. येथील नितीनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल विठ्ठलराव कोल्हे यंाच्या जात अवैधता प्रकरणाचा औरंगाबाद उच्च न्यायालय, खंडपीठातून अंतिम निर्णय होत नाही,तोपर्यंत त्यांना सेवानिवृत्तीचे व कोणतेच आर्थिक लाभ देण्यात येवू नये अशी तक्रार  माजी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही.एम.भोसले यंानी नांंदेड शिक्षणाधिकार्‍यांकडे केली होती,त्यांची दखल घेवून शिक्षणाधिकार्‍यांनी कोल्हे यांच्या प्रकरणाला तूर्त स्थगीत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की  मुखेड तालुक्यातील जांब बु. येथील नितीनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल विठ्ठलराव कोल्हे याचे अनुसूचीत जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र औरंगाबादच्या अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने व्ही.एम.भोसले यंाच्या तक्रारीवरुन चौकशीअंंती अवैध ठरविले आहे.या आदेशाविरोधात अनिल कोल्हे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका क्र.५५२१/२०१७ क्रमांकाने याचिका दाखल केली आहे.सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ  असून, अनिल कोल्हे हे दि.३० जून २०२० रोजी सेवानिवृत्त होत असल्याने,त्यांना सेवानिवृत्तीसह आर्थिक लाभ देण्यात येवू नये,अशी मागणी व्ही.एम.भोसले यांनी लातूर विभागीय शिक्षण  उपसंचालक व नांदेडच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे दि.१९ व २२ जून रोजी केली होती.२९ जून पर्यंत आपल्याला अवगत न केल्यास सत्याग्रह करण्याचा इशारा भोसलेयांनी दिला होता.त्या तक्रारीची दखल घेवून नांदेड माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना अनिल कोल्हे यांना सेवानिवृत्तीचे लाभ तूर्त देण्यात येणार नसल्याचे जा.क्र/जिपनां/शिअ/मा-८१५७०/२०२० दि.२९ जून २०२० रोजीच्या पत्राने व्ही.एम.भोसले यांना कळविले आहे.या पत्राच्या प्रति जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,नांंदेडसह, शिक्षण उपसंचालक,लातूर व इतराना दिल्याआहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या