मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या कामाची
पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून पाहणी
कामाबद्दल समाधान प्रकल्पास महाराष्ट्र शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य
लातूर प्रतिनीधी : दि. ७ जूलै:
लातूर एमआयडीसी परीसरात उभारण्यात येत असलेल्या रेल्वे कोच प्रकल्पास राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री नर. अमित देशमुख यांनी मंगळवारी भेट दिली कामाच्या प्रगती बददल समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प सन २०२१ मध्ये सुरू होईल पूढे त्यांचा टप्प्याटप्प्याने वीस्तार होणार असून केंद्र शासनाच्या या प्रकल्पास महराष्ट्र सरकारचे सर्वतोपरी सहकार्य असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मधून निर्धारित केलेल्या वेळेत मेट्रो कोच बाहेर पडावी यासाठी अधिक गतीने काम करावे. तसेच सध्या जे सिविल वर्क सुरू आहे ते ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करून प्रत्यक्ष मशनरीच्या कामांना कशा पद्धतीने वेळेत सुरुवात करता येईल या दृष्टीने रेल्वे विभाग व संबंधित गुत्तेदार यांनी समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच पुढील तीन महिन्यात पुन्हा रेल्वे कोच फॅक्टरीला भेट देऊन येथील झालेल्या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संबंधित रेल्वेचे अधिकारी अभियंते व संबंधित गुत्तेदार यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी देऊन सध्या सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. त्याप्रमाणेच येथील कामाची गुणवत्ता व दर्जाही चांगला असल्याचे त्यांनी म्हंटलं.
या प्रकल्पाच्या सिविल वर्क कामाचे हेड महेश लंगरे यांनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी प्रोजेक्ट चा मॅप दाखवून त्या मॅप नुसार सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास ७० ते ७५ टक्के सिव्हिल वर्क कामे पूर्ण झालेली असून माहे ऑक्टोबर २०२० अखेरपर्यंत शंभर टक्के सिविल वर्कची कामे पूर्ण होऊन माहे डिसेंबर २०२० पासून मशिनरी बसवली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
तसेच सिविल वर्कच्या कामासाठी ३२२ कोटी रुपये मंजूर असून मशिनरी च्या कामाचे वेगळा निधी असून या प्रकल्पाचा एकत्रित निधी जवळपास एक हजार ते बाराशे कोटी रुपयांचा असल्याची माहिती श्री लंगरे यांनी दिली. तर या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनियर काशिनाथ गजरे यांनी प्रकल्पाच्या संपूर्ण कामांची माहिती देऊन येथून मेट्रो रेल्वे कोच निर्माण होणार आहेत. मेट्रो रेल्वे कोच चा हा भारतातील चौथा व महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे ४०० एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहत असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
या पाहणी वेळेस लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेशकुमार मेघमाले, रेल्वे प्रकल्पाच्या सिविल वर्क कामाचे हेड महेश लंगरे, गणेश त्यागी, प्रकल्पाचे असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनिअर काशिनाथ गजरे, गोदू मोहते, गुतेदार संजय माने यांच्यासह प्रकल्पाचे इतर अभियंते उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये सुरू असलेल्या सर्व कामाची पाहणी केली. तसेच एकंदरीत संपूर्ण प्रोजेक्टची माहिती घेऊन प्रोजेक्ट लवकर पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेची पाहणीही पालकमंत्री देशमुख व आमदार धीरज देशमुख यांनी केली.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.