स्कुलबसच्या चालक - मालकांना मदत करण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लातूर /प्रतिनिधी: कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्याची वाहतूक करणारे स्कुलबस चालक आणि मालक संकटात सापडले आहेत.अडचणीच्या काळात त्यांना मदती करावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत बंद आहेत.त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्याची वाहतूक आणि त्यामाध्यमातून स्कुलबसच्या चालक आणि मालकांना मिळणारे उत्पन्न बंद आहे. यासंदर्भात संघटनेने दि.३०एप्रिल रोजी मुख्यमंत्र्याना निवेदन दिले होते पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे संघटनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व चालक आणि मालकांना महिना ११ हजार रुपये द्यावेत. बँक,फायनान्स तसेच वीजबिलात एक वर्षांची माफी द्यावी. आरटीओ पासिंग आणि विमा संदर्भातील व्यवहार एक वर्षापर्यंत माफ करावेत.शाळा सुरू होईपर्यंत स्कुलबसना राज्यात प्रवासी वाहतुकीचा परवाना द्यावा, सर्व स्कुलबस चालकांना विमा संरक्षण द्यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
या निवेदनावर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माधव कुलकर्णी आणि सचिव मारुती सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.