पीकविम्यासाठी जिल्हा बँकेची गावात व्यवस्था.


पीकविम्यासाठी जिल्हा बँकेची गावात व्यवस्था... 

औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार /- प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख आहे. कोरोना विषाणूच्या वसंकटामुळे पिक विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नये, 
म्हणून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेने गावात सोसायटीच्या चेअरमन मार्फत पीक विमा प्रस्तावासह हप्त्याची रक्कम स्वीकारण्याची व्यवस्था केली असून, लामजना  विस्तारित शाखेचे व्यवस्थापक महेश सोमवंशी यांना  चलबुर्गा येथे पिक विमा भरून घेण्यास चा शुभारंभ केला. शाखे अंतर्गत 4 हजार शेतकरी असून पहिल्याच दिवशीच 1047 शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह सोशल डिस्टन्स ठेवून उस्फूर्तपणे पिक विमा भरला. चलबुर्गा येथे शेतकऱ्यांनी या योजनेस चांगला प्रतिसाद दिला. जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, चेअरमन शंकर मोरे, सेक्रेटरी प्रभाकर माळी, शाखा तपासणीस कोळपे, रोखपाल सौदागर, लिपिक श्रीमती मोरे, गटसचिव रफिक शेख, दत्ता गोरे यांनी यावेळी सहकार्य केले. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी गावात सुविधा दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

जिलाधिकारी लातूर का नया आदेश क्या है देखें वीडियो 
https://youtu.be/UYoC6T09o_4


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या