लातूर शहर महानगरपालिका, लातूर हद्दीत दिनांक 19/07/2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत 20 व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज पर्यंत 446 कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी 205 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तसेच मयत रुग्ण 21 असून आज रोजी एकुण 220 अॅक्टीव रूग्ण संख्या आहे. एकुण मयत व्यक्ती पैकी वय वर्ष 50 च्या पुढील रूग्ण संख्या 16 इतकी आहे. एकुण मयत रूग्णापैकी 3 स्त्री व 18 पुरूष आहेत. लातूर शहर महानगरपलिका हद्दीत आज रोजी 142 कंटेन्मेंट झोन कार्यरत (Active) आहेत.
करोना रुग्णांचा वाढता प्रार्दुभाव पाहता लातुर शहर महानगरपालिकेच्या 3 आग्निशमन वाहनामार्फत शहरातील मुख्य रस्ते (5 नं. चौक ते विवेकानंद चौक, राजीव गांधी चौक ते आहिल्या देवी चौक, बस स्टॅंन्ड, गंज गोलाई परिसर, सुभाष चौक, गुळ मार्केट ते बसवेश्वर चौक, जुना औसा रोड, नाना-नानी पार्क समोरील रस्ता इत्यादी) रस्त्यावर सोडियम हायपोक्लोराईड याची फवारणी करण्यात आली आहे. उद्यापासुन शासकिय कार्यालय (जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, न्यायलय परिसर, पोलीस स्टेशन,प्रशासकिय ईमारत इत्यादी) ठिकाणी फवारणी करुन, शहरातील सर्व प्रभागामध्ये सोडियम हायपोक्लोराईड याची फवारणी करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.