हनेगाव येथील शेतकरी पुरात वाहून गेला मरखेल पोलिसांकडून शोध कार्य सुरू देगलूर प्रतिनिधी( संतोष चिद्रावार ) देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील शेतकरी आज सकाळी शेतात बैल घेऊन जात असताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेला असल्याची माहिती देण्यात आली असून मरखेल पोलिसांच्यावतीने शोध चालू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली देगलूर तालुक्यातील मौजे हाणेगाव परिसरात आज दिनांक २० जुलै सकाळी मुसळधार पाऊस झाला यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे मौजे हाणेगाव येथील शेतकरी हनुमंत गोरे हा आपले बैल घेऊन शेती कडे जात असताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदरील शेतकऱ्यांच्या शोध घेण्याचे काम पर्यंत चालू होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.