सहकार्यामुळेच पंतप्रधान सहाय्यतानिधीला दीड कोटी रुपये देऊ शकलो - गुरुनाथ मग्गे


सहकार्यामुळेच पंतप्रधान सहाय्यतानिधीला दीड कोटी रुपये देऊ शकलो - गुरुनाथ मग्गे 

लातूर: कोरोना महामारीचा विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळेच मी पंतप्रधान सहाय्यता निधीला दीड कोटी रुपये मदत करू शकलो, असे प्रतिपादन  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सत्कार प्रसंगी गुरुनाथ मग्गे बोलत होते.
     महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कोरोनाच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी आपल्या जिवाची पर्वा न करता समाज हितासाठी सहकार्य केले अशा लोकांना कोरोना योद्धा म्हणून गुणगौरव पत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहर जिल्हाध्यक्ष  भाजपा गुरुनाथ मग्गे यांच्या कार्याची दखल घेऊन आज त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. लातूर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांच्या हस्ते मग्गे  यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी पत्रकार संघाचे महादेव डोंबे , अशोक हनवते, अरुण कांबळे ,नितीन भाले , प्रदीप कवाळे, हरून मोमीन, कायदेशीर सल्लागार  अॅड.आसिफ पटेल उपस्थित होते.
    गुरुनाथ मग्गे यांनी कोरोनाच्या काळात जिल्ह्यात 40 हजार लोकांना अन्नधान्याचे किट वाटप, 30 हजार लोकांना फूड पॉकेट वाटप एवढेच नसून वसवाडीत अडकलेल्या परप्रांतीयांना फूड पॉकेट तसेच दिल्लीमध्ये अडकलेल्या मुलांना जेवणाची वेगळे व्यवस्था करून एक आदर्श निर्माण करून दिला आहे तसेच पिंपरी चिंचवड येथे ते 16 कामगारा अडकले असता त्यांनाही जेवणाच्या पॉकेटची सोय त्यांनी केली होती.लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या साह्याने 6000 अन्नधान्याचे किट ग्रामीण भागात वाटपाचे काम त्यांनी केले आहे. एवढेच नसून आज अनैसर्गिक गोळ्या,मास्क्रीनवर,सॅनिटायझर वाटपाचे ही काम त्यांनी शहर व जिल्ह्यात केले आहे. पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी त्यांनी अतिशय या काळात प्रामाणिकपणे केल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई  जिल्हा शाखा लातूरच्या वतीने आज यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव डोंबे यांनी तर आभार अरुण कांबळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या