आ. अभिमन्यु पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हिप्परसोगा येथे वृक्षारोपण
औसा /प्रतिनिधी: औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील हिप्परसोगा येथे वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम साजरे करावेत,असे आवाहन आ. पवार यांनी केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत हिप्परसोगा येथे आंबा, चिकू ,नारळ आदींची 100 झाडे लावण्यात आली. गावच्या सरपंच सविता कांबळे, ग्रामसेवक भुसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विठ्ठल सोमवंशी, हेमंत पाटील, अमोल सोमवंशी,सचिन पाटील, अतुल पाटील,अमर पाटील, मारुती चेवले, पोलीस पाटील बालाजी कांबळे,विठ्ठल संपते,सुहास पाटील, महादेव चिंचोले,तुकाराम सोमवंशी, समाधान कांबळे, यादवराव पाटील, शंकरराव आळंदकर, संभाजी यादव,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी ,जगदीश यादव ,विनायक चेवले,अंगद गोरे ,गोविंद सीतापुरे ,
सुनीता यादव, लतिका पाटील, सरिता चिंचोले, रुक्मिणबाई आळंदकर, सुरेखा सोमवंशी, तेजस्विनी पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.