आपसातील समन्वय याच्यामुळेच कोरोनावर नियंत्रण राखू शकलो - हिम्मत जाधव
लातूर: लातूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर यांच्यावतीने गौरवपत्र देऊन जिल्हा अध्यक्ष अशोक देडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव म्हणाले की पालकमंत्री, राज्यमंत्री, सर्व आमदार व माझे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच माझे सर्व सहकारी पोलीस बांधव यांच्यात व माझ्यात समन्वय असल्यामुळेच आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी होऊ शकलो आहे. जोपर्यंत कोरोनावर लस निघत नाही तोपर्यंत आटोक्यात येणार नाही असेच वाटते याचा प्रसार रोखण्यासाठी स्वतः रूग्णांनी स्वतःला विलगीकरण करून घेणे गरजेचे वाटते याकडे लोक मात्र गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आज जिल्ह्यात दिसून आहे. यासाठी वारंवार लॉक डाउन करणे हा पर्याय होऊ शकत नाही. आम्ही पोलीसांनी थोडी कडक भूमिका घेतली की आमच्यावर अत्याचार केला जातो असेही बोलले जाते. पण आम्ही ही केवळ रोगराई वाढू नये म्हणून असे कठोर भूमिका घेत असतो हे जनतेने लक्षात घ्यावे, असे ते यावेळी म्हणाले. या रोगावर नियंत्रण आणण्याचा आम्ही प्रयत्नही केला आहे. आमच्यातील आपसात समन्वय असल्यामुळेच ही बाब करता आली असेही हिम्मत जाधव म्हणाले. पोलिसाच्या संयमाचा अंत पाहू नये नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून घ्यावी व या रोगापासून मुक्तता करावी असे मला वाटते असेही हिम्मत जाधव मनाले.
सोहळ्याला जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर स्वामी,लातूर जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रघुनाथ बनसोडे ,जिल्हा सरचिटणीस अशोक हनवते, जिल्हा संघटक महादेव डोंबे, कोषाध्यक्ष अरुण जे कांबळे सदस्य अमोल घायाळ आदी उपस्थित होते.
उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.