ग्रीन लातूर वृक्ष टिम तर्फे शिक्षक कॉलनी येथे ५६० मोठ्या वृक्षांचे वृक्षारोपण



ग्रीन लातूर वृक्ष टिम तर्फे शिक्षक कॉलनी येथे ५६० मोठ्या वृक्षांचे वृक्षारोपण
शहराच्या पुर्वभागातील शिक्षक कॉलनी येथे स्थानिक रहिवाशी यांच्या मदतीने ग्रीन लातूर वृक्ष टिमने ५६० मोठ्या रोपांचे रोपण केले.



कडुनिंब, तनिकरोजिया, सप्तपर्णी, बकुळ, गौरीचंदन, करंज अशा मोठ्या पर्यावरणपुरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. परिसरातील नागरीकांनी या झाडांचे संगोपन करु असा निर्धार घेतलेला आहे. गेल्या ५-६ दिवसापासून सुरु असलेले ५६० झाडांच्या वृक्षारोपण प्रकल्पाचा समारोप डॉक्टर्स डे निमित्ताने करण्यात आला. लातूर येथील प्रसिध्द श्वसनविकार तज्ञ डॉ. रमेश भराटे, क्षकिरण तज्ञ डॉ. अभय कदम, दंतरोग तज्ञ डॉ. संजीवनी कुलकर्णी, दंतरोग तज्ञ डॉ. गिरीष कुलकर्णी, जनरल फिजिशियन डॉ. विनोद कदम, सामाजिक कार्यकर्ते अविनाश बट्टेवार यांच्या हस्ते समारोपाची झाडे लावण्यात आली.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष चे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, प्रमोद निपानीकर,  मनमोहन डागा, नगरसेवक विजयकुमार साबदे, रुषिकेश दरेकर, जफर शेख, हितेश डागा, चैतन्य प्रयाग, सिताराम कंजे, सुलेखा कारेपुरकर, सार्थक शिंदे, रुषिकेश पोद्दार,  शैलेश सुर्यवंशी, डॉ. मुश्ताक सय्यद, कल्पना फरकांडे, महेश गिल्डा, पुजा निचळे, स्वाती यादव, सौ. सिमा धर्माधिकारी, विकास कातपुरे, शिक्षक कॉलनी चे बालाजी शिंदे, लक्षमन केंद्रे, खंडू कलकते, जुकले सर, गवळी, कल्याणकर, सिरसाट, घटकर, शिंदगे, हटे ,भिगोले सर इत्यादी सर्वांनी वृक्ष लागवडीकरीता खड्डए खोदणे, झाडे आणणे, काळी माती आणणे, झाडे लावणे, पाणी देणे याकरीता परिश्रम घेतले.

प्रती
संपादक दैनिक
वरील बातमी आपल्या लोकप्तिय दैनिकात प्रकाशित करावी ही विनंती.
फोटोमध्ये
ग्रीन लातूर वृक्ष टिमतर्फे झाडे लावून झाल्यानंतर त्या रस्त्यावर फित कापून प्रवेश करताना डॉ. रमेश भराटे, डॉ. अभय कदम, डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, नगरसेवक विजयकुमार  साबदे, बालाजी शिंदे, मनमोहन डागा आदी



उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या