जिल्ह्यात गत 24 तासात 74.76 मि.मी. पावसाची नोंद




जिल्ह्यात गत 24 तासात 74.76 मि.मी. पावसाची नोंद
 
हिंगोली,दि.1: जिल्ह्यात दि.1 जुलै, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 74.76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 14.95  मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 229.59 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 26.71 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दि. 1 जुलै, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली-6.14 (214.87) मि.मी., कळमनुरी-5.00 (180.32) मि.मी., सेनगांव-2.83 (265.04) मि.मी., वसमत-26.29 (184.45) मि.मी., औंढा नागनाथ-34.50 (303.25) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 229.59 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****
                                                      
 
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
 
हिंगोली,दि.1: हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


उमर फारुख युवा मंच औसा च्या वतिने आमदार अभिमन्यु पवार याना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या