निजाम शेख यांचा पाठपुरावा यशस्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर विशेष अभ्यासमालिका







निजाम शेख यांचा पाठपुरावा यशस्वी 
शालेय विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर विशेष अभ्यासमालिका 

लातूर /प्रतिनिधी:कोरोनामुळे राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत असून ऑनलाईन शिक्षण घेणे सर्वच विद्यार्थ्याना शक्य नाही. त्यासाठी दूरदर्शनवरून अभ्यासमालिका सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली होती. ही मागणी सरकारने मान्य केली असून सोमवारपासून या अभ्यास मालिकेचे प्रसारण सुरू झाले आहे. याबद्दल शेख यांनी सरकारचे आभार मानले आहेत. 
 यावर्षी कोरोनामुळे शाळा उघडू शकल्या नाहीत.शाळाच नसल्याने विद्यार्थ्याना अभ्यास नाही.याला पर्याय म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षण देण्याची सूचना केली होती.परंतु ग्रामीण भागात अनेक पालकांकडे लॅपटॉप किंवा अँड्रॉइड मोबाईल नाहीत.त्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे कठीण आहे. ही बाब लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवरून अभ्यासामालिका सुरू करावी,अशी मागणी निजाम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली होती. शालेय शिक्षण मंत्री वर्षा  गायकवाड यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता. 
   शेख यांनी केलेली मागणी आणि गरज लक्षात घेत सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिली - मिली ही अभ्यासामालिका सुरू केली आहे. डी डी सह्याद्री या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे .इयत्ता आठवी साठी सकाळी ७.३० ते ८,इयत्ता सातवी सकाळी ८ते ८.३०,इयत्ता सहावी सकाळी ९ते ९.३०,इयत्ता पाचवी सकाळी ९.३० ते १०,इयत्ता चौथी सकाळी १०ते १०.३०,इयत्ता तिसरी सकाळी १०.३० ते ११,
इयत्ता दुसरी सकाळी११.३० ते १२,इयत्ता पहिली दुपारी १२ ते १२.३० यावेळेत विद्यार्थ्याना मालिका पाहून अभ्यास करता येणार आहे.
डी.डी.सह्याद्री वाहिनी Tata sky वर १२९९ ,Airtel वर ५४८,Dish TV वर २२९ ,
Videocon D2H वर ७६९ ,
DD Free dish वर ५२५ आणि 
Hathway वर ५१३ या क्रमांकावर दिसते.
रविवारी या आनंददायी शाळेस सुट्टी असणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीचा बालभारतीचा पहिल्या सत्रातील  अभ्यासक्रम या शाळेतून शिकवला जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी या शाळेचा लाभ घेण्याचे आवाहन निजाम शेख यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या