दिनांक:-09 जूलै 2020
हॉटेल शॉपींग मॉल अतिथी सेवा संदर्भात
सुधारित आदेश जारी
लातूर दि.9-(जि.मा.का.) कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हॉटेल, शॉपिंग मॉल, अतिथी सेवा संदर्भातील आस्थायपनांबाबत सुधारित निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, जी.श्रीकांत, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये पुढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधीत (Contentment Zone) क्षेत्राबाहेर हॉटेल आणि इतर आस्थािपना ज्यािमध्येह लोकांना राहण्याnची व्यतवस्थाल उपलब्धि असते जसे की, लॉज, गेस्ट् हाऊस इत्याादी यांना मर्यादित स्वेरुपामध्ये सुरु करता येईल. सदरील आस्था्पना त्यांजच्याध क्षमतेच्या 33 % क्षमतेने आणि कोवीड-19 बाबत शासनाने निर्गमीत केलेल्या सूचनांच्याा अधिन राहून सुरु ठेवता येईल. तसेच या आदेशात ज्यास बाबी नमुद नाहीत परंतु यापूर्वी शासन आदेश व या कार्यालयाचे आदेशान्वये प्रतिबंधीत अथवा शिथील केलेल्याा आहेत अशा बाबी त्याे बाबीसंदर्भात या पूर्वीच्याे लगतच्या आदेशानुसार लागू राहतील.
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्याहत यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यरक्ती्, संस्था , अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्तीह व्यिवस्थाेपन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्याीसाठी कोणत्याशही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्दद कार्यवाही केली जाणार नाही असे ही आदेशात नमुद केले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.