लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन





लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्या मार्फत  राष्ट्रपतींना निवेदन

लातूर प्रतिनिधी:

सध्याच्या चिंताजनक कोविड-१९ महामारीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येऊ नयेत,त्या तात्काळ  रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन  आज गुरुवार दिनांक २३ जुलै रोजी लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने  जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत  महामहिम राष्ट्रपतींना देण्यात आले.

कोरोना विषाणूंने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या भारतात १.२  दशलक्षापर्यंत गेली आहे.  त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे  महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकांना परीक्षा देणे योग्य आणि सुरक्षित नाही तसेच ऑनलाईन परीक्षा घेणे अत्यंत कठीण असून भारतात बऱ्याच ठिकाणी दुर्गम भागात ऑनलाइन परीक्षाची सोय नाही यामुळे गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो.
लाॅकडॉऊनमुळे विद्यार्थ्यांच्या जवळ अभ्यासासाठी लागणारे आवश्यक साहित्य नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा या तात्काळ  रद्द कराव्यात असे लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने  महामहीम राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांना लातूर जिल्हाअधिकाऱ्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे,उपाध्यक्ष अभिषेक पतंगे, सरचिटणीस गोविद आलुरे, प्रभाग आकराचे प्रभाग अध्यक्ष विकास कांबळे, सोशल मीडिया प्रमुख सुनील वाळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या