कोवीड-१९च्या प्रयोग शाळेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन
औसा मुख्तार मणियार
दिनांक (२३ जुलै) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोवीड-१९च्या तपासणी प्रयोग शाळा व संशोधन केंद्र आंबेडकर आरटीपीसीआर कोवीड-१९ विद्यापीठ तपासणी सुविधेचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी १२:वाजता जिल्हा अधिकार कार्यलयातील सभागृहात करण्यात आले
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढता चालला आहे. रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली जात आहे. तसेच उस्मानाबादेतील कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणी करण्यासाठी प्रयोग शाळा नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला पुणे, सोलापूर, लातूर, आंबेजोगाई येथून तपासणीचे अहवाल मागविण्यात येते होते.रूग्ण संख्या थांबणे, रूग्णांचे होणारे हाल थांबवणे यासाठी जिल्हा
प्रशासन, डाॅ..बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि समाजातील दानशुर व्यक्तींनी मिळून उस्मानाबाद कोवीड-१९ तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे, या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंञी राजेश टोपे, जिल्हाचे पालक मंञी शंकराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुंधोळ-मुंडे, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी , पञकार, समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.