नव्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना मिळेल तात्काळ न्याय
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष ॲड.महेश ढवळे यांच्याकडून कायद्याचे स्वागत
लातूर /प्रतिनिधी :देशात दि २० जुलै पासून नवा ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे.या कायद्यामुळे ग्राहकांना तात्काळ न्याय मिळेल असे सांगत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड. महेश ढवळे यांनी या कायद्याचे स्वागत केले आहे.
व्यवहारात अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. यासंदर्भातील तक्रारी वाढत आहेत.ही बाब लक्षात घेता या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.या नव्या कायद्यानुसार न्यायालयांना वाढीव अधिकार देण्यात आले आहेत.फसवणूक करणाऱ्यास केवळ दंड अथवा भरपाई ऐवजी तुरुंगात पाठवण्याची तरतूद करण्यात आली आहे. उत्पादकांसोबतच त्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीसही आता जबाबदार धरण्यात येणार आहे. हा कायदा सर्व प्रकारच्या सेवा आणि वस्तू यांना लागू असणार आहे. कोठेही खरेदी केली तरी ग्राहक तो जेथे राहतो तेथील ग्राहक आयोगात तक्रार करू शकणार आहे.आता विमा कंपनी,बिल्डर,ट्रॅव्हल्स कंपनी , बँका आणि पुरवठादार कंपन्यांच्या विरोधातही दाद मागता येणार आहे.
या कायद्याने ग्राहकांना न्याय मिळणार असल्याचे सांगत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे लातूर जिल्हाध्यक्ष महेश ढवळे, जिल्हा संघटक दत्तात्रय मिरकले, तालुकाध्यक्ष ॲड संगमेश्वर रासुरे, इस्माईल शेख ,ॲड सुनयना बायस,प्रा एन. जी. माळी,आशा केंद्रे,स्वाती पाचणकर,माधव भांडे,धनराज जाधव,बळवंत कागले आदींनी या कायद्याचे स्वागत केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.