विभागीय स्टेडीयमचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करा
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
लातूर दि.21/07/2020
महाराष्ट्र शासनाने विभागीय स्टेडीयम मराठवाड्यासाठी मान्य करून सदरील स्टेडीयम कव्हा ता.जि.लातूर येथील गट नं.230 मधील 8 हेक्टर 79 आर.(22 एकर) जमीनीवर भव्य असे स्टेडीयम उभारण्यास मान्यता देण्यात आली. या स्टेडीयमच्या कंपाऊंड वॉलचे काम 80 टक्के पुर्ण झालेले आहे. वरील सर्व कामकाजाची कायद्याप्रमाणे पुर्तता करण्यात आली आहे. तसेच क्रीडा संकुल अधिक भव्य करण्यासाठी 24 कोटीची तरतुद वाढवून ती 48 कोटीच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. परंतु पुर्णत्त्वास येत असलेल्या विभागीय स्टेडीयमचे काम बंद पडलेले आहे. त्यामुळे लक्ष देवून या विभागीय स्टेडीयमचे काम पुर्णत्त्वास न्यावे व ग्रामीण व शहरी जनतेवर होणारा अन्याय दुर करावा, अशा मागणीचे निवेदन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत निवासी जिल्हाधिरी कुलकर्णी यांना देण्यात आले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमीत देशमुख यांना क्रीडा संकुलाचे काम बंद झाले असून ते पुन्हा चालु करण्याची मागणी केली असल्याचे कव्हेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने विभागीय स्टेडीयम मराठवाड्यासाठी मान्य करून सदरील स्टेडीयम कव्हा ता.जि.लातूर येथील गट नं.230 मधील 8 हेक्टर 79 आर.(22 एकर) जमीनीमध्ये करण्यास मान्यता शासन आदेश क्रमांक जमीन-43/31-12 प्र.क.81 351-7 दि.10/05/2013 प्रमाणे दिली. जमीनीचा ताबा देण्याचा आदेश दि.26/08/2013 तहसिलदार लातूर यांनी दि.29/10/2013 रोजी फेरफार घेवून उपसंचालक क्रीडा समिती यांनी दि.31/07/2016 पर्यंत बांधकाम पुर्ण करण्याची लेखी हमी दिली. दरम्यान 26 ऑगस्ट 2014 रोजी कव्हा क्रिडा सकूंल साईडवरती भूमिपुजन समारोह मा.ना.अमित देशमुख यांच्याहस्ते संपन्न झालेला आहे. अधिक्षक अभियंता बांधकाम विभाग उस्मानाबाद यांनी कंपाउंड वॉलच्या 1,46,37,378/- रूपयाला तांत्रिक मान्यता 17 जून 2019 रोजी दिली. व त्याप्रमाणे टेंडर काढून कंपाउंड वॉलचे काम प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आले असून ते काम 80 टक्के पुर्ण झालेले आहे. वरील प्रमाणे सर्व कायद्याप्रमाणे पुर्तता करण्यात आली व क्रिडा संकुल अधिक भव्य करण्यासाठी 24 कोटीची तरतुद वाढवून 48 कोटीची तरतुद शासनाने केली असल्याचे समजते.
मराठवाड्याच्या, लातूर जिल्ह्याच्या, या भागाच्या विकासासाठी या भागातील खेळाडूसाठी हा प्रकल्प पुर्ण होणे गरजेचे आहे. प्रकल्प पुर्ण व्हावा, अशी मागणी या भागातील ग्रामीण व शहरी जनता करीत आहे. वरील प्रकल्प आपल्या पुढाकारामुळेच कव्हा येथील जमीनीमध्ये सुरूवात झाली आहे. तो पुर्ण व्हावा, अशी आपणांस आग्रहाची मागणी आहे. तरी, क्रिडा संकुलाचे थांबलेले काम पुर्ववत चालु करण्याच्या सुचना संबंधीतांना देवून या भागातील जनतेला न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत निवासी जिल्हाधिकारी मा.कुलकर्णी यांना देण्यात आले. या निवेदनावर जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषअप्पा सुलगुडले, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, प्रा.गोविंदराव घार, जननायक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार,कव्ह्याचे उपसरपंच किशोर घार, बालाजी शेळके, चांडेश्वरचे उपसरपंच जीवन गुंजरगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
––
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.