बंडखोरी आणि काँग्रेसची भुमिका ...
मध्य प्रदेशात काँग्रेसचे ११४ आमदार होते. सिंदिया जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांना २२ आमदारांचे समर्थन मिळाले. मध्यप्रदेशमध्ये तसेही काठावरचे बहुमत होते. २२ आमदार बाहेर पडल्यावर सरकार गेले.
काँग्रेस नेतृत्वाचे म्हणजे राहुल गांधींचे हे अपयश आहे असं आपल्या सर्वांना मग सांगितलं गेलं.
११४ मधून २२ वजा केले तर ९२ उरतात. हे ९२ आमदार कमलनाथसोबत उभे राहिले. २०१८ ला सुद्धा आणि २०२० ला सुद्धा!
आता ज्यांच्या मागे ९२ आमदार आहेत त्यांच्या सोबत काँग्रेस नेतृत्वाने उभं रहायचं की २२ आहेत त्यांच्या मागे? लोकशाहीत बहुमताचा आदर करायचा असतो मग ९२ हे बहुमत की २२?
सिंदिया यांनी ११४ पैकी किमान ५० तरी आमदार सोबत खेचले असते तर गांधींना सिंदिया यांचं ऐकता आलं असतं. पण, २२ आमदारांच्या नेत्यांचं ऐकून ९२ आमदारांच्या नेत्यांना डावलणं कुठल्याच नेत्याला शक्य नसतं. राज्य सरकार गमवावं लागलं तरी ठीक. ते आज ना उद्या येईल. पूर्ण पक्षच त्या राज्यातून गमावणं अधिक धोकादायक. कमी धोकादायक गोष्ट करून काँग्रेस नेतृत्वाने संदेश दिला.
राजस्थानात काय होतंय?
काँग्रेसचे आमदार आहेत १०७. पायलटसोबत किती जातील? ३०! माहीत नाही तितके जातील की नाही. पण धरून चालू ३०!! किती उरले? ७७!!! म्हणजे गेहलोत सोबत ७७ आहेत. आता ७७ मोठे की ३०? कुणाचं ऐकायचं गांधींनी?
३० वाल्यांचं ऐकलं तर गांधी लोकशाहीवादी ठरतात आणि ७७ वाल्यांचं ऐकलं तर ते लोकशाहीविरोधी ठरतात ? हे इथल्या राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण !
सचिन वयाच्या २६ व्या वर्षी खासदार, ३१ व्या वर्षी केंद्रीय मंत्री झाले. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. उपमुख्यमंत्री आहेत. गेहलोत यांची ही चौथी आणि शेवटची टर्म आहे मुख्यमंत्रीपदाची. यानंतर निव्वळ पद नाही तर अख्खा राजस्थान काँग्रेस सचिन यांच्या नेतृत्वाखाली जाणार हे उघड सत्य आहे. तरीही राज्यसभा निवडणुकीत मला सीएम करत असाल तर मी आमदार तोडून तुमचा उमेदवार जिंकवतो अशी ऑफर द्यायची काय गरज होती ? असो!!
काँग्रेस नेतृत्वाने तातडीने एक स्पष्टीकरण काढायला हवं. जे आता सोडुन गेले आहेत त्यांना भविष्यात कधीही पक्षाच्या दारात पण उभं करणार नाही. या लोकांसाठी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद!! काय व्हायचं ते होईल पक्षाचं पण ह्यांना परत प्रवेश नाही!!!
हा इतिहास आहे. काँग्रेस तुटत नाही तोवर उठत नाही! तुटण्याची गरज आहे! हे आधीच व्हायला हवं होतं! अजून व्हायला हवं! लवकर तुटायला हवी!!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.