लातूर जिल्ह्याचा लॉक डाऊन दोन टप्प्यात.
पहिला टप्पा :- 15 ते 20 जुलै.
दुसरा टप्पा:- 21 ते 30 जुलै.
किराणा दुकाने किरकोळ व ठोक पहिल्या टप्प्यात बंद असतील तर दुसऱ्या टप्प्यात केवळ घरपोच सेवा उपलब्ध सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच (दुकान उघडता येणार नाही)
सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग किंवा एव्हीनिंग वॉक ला बंदी.
मॉल, बाजार,सलून,आडत,फेरीवाले हे सगळे पहिल्या टप्प्यात बंद.
मटण चिकन ची दुकाने पहिल्या टप्प्यात बंद तर दुसऱ्या टप्प्यात 7 ते 12 पर्यंत दुकान चालू ठेवता येईल.
अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहतूक पूर्णपणे बंद.
या पूर्ण काळात केवळ नोंदणीकृत विवाह सोहळ्याला परवानगी.
धार्मिक स्थळे बंद राहतील.
दूध विक्री सकाळी 10 पर्यंतच राहील.
वैद्यकीय सेवा सुरू असतील.
ऑनलाईन औषध वितरण सेवा दवाखान्या शेजारी असलेली मेडिकल दुकाने 24 तास सुरू राहतील व इतर ठिकाणची मेडिकल दुकाने दुपारी 12 पर्यंत चालू असतील.
पेट्रोल पंप चालू असतील पण अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच इंधन मिळणार पण त्यासाठी ओळखपत्र अनिवार्य.
वृत्तपत्र वितरण सकाळी 6 ते 9 पर्यंत परवानगी.
पहिल्या टप्प्यात बँक चालू असतील पण केवळ शासकीय कामासाठी.
शेती साठी लागणारे साहित्य दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच चालू राहतील (दररोज).
अशी माहिती लातूरचे जिल्हाधिकारी मा.जी.श्रीकांत यांनी आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.