लातूरमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात
आम आदमी पार्टीचे दुचाकी ढकलून निवेदन!
लातूर,दि.२ः एकीकडे कोरोनाची महाखाईने सर्वसामान्य जनता भरडली जात असताना केद्र शासनाकडून वरचेवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करुन जखमेवर मिट चोळण्याचा निदनीय प्रकार केला जात असल्याचा निषेध करत, लातूर जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने बुधवार,दि.१ जुलै २०२० रोजी दुपारी लातूरमध्ये पाच नंबर चौक ते जिल्हाकचेरी दरम्यान प्रतिकात्मक दुचाकी ढकलत नेवून जिल्हाधिकार्यांना पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, गेली चार महिन्यांपासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्वच समाज घटक प्रभावीत झाला आहे, प्रत्येकालाच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटातच जीवघेणी महागाईची भर पडत आहेेच, त्यातच आता केंद्र शासनाकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे.एक प्रकारे हा दुष्काळात तेरावा महिना झाला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे साहजिकच वाहतूक खर्च वाढणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ होवून महागाईच्या भस्मासुरात जनता भरडली जात आहे, अगोदरच कोेरोनामुळे बर्याच लोकांच्या हातचे काम गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. कोरोनामुळे कमी आणि उपासमारीने लोकांचे मृत्यु होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाचे भाव कमी असताना केंद्र सरकार जाणीवपूर्वक दरवाढ करुन जनतेला छळतआहे,असा आरोप करुन ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले, जिल्हा सचिव सैदोद्दीन सय्यद, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अमित पांडे, युवा आघाडी सांस्कृतिक प्रमुख शाम माने, निलंगा विधानसभा अध्यक्ष आनंदा कामगुंडा, आदिंची नावे व सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.