कोरोना बाबतीत उपाययोजना करूनच टाळेबंदी करावी
शहर जिल्हा भाजपाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
लातूर ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या दरम्यान लातूर शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागली असल्याने कोरोना साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे टाळेबंदी करावी अशी मागणी करीत शहर जिल्हा भाजपाने टाळेबंदीच्या आधी कोरोना रोखण्याबाबतच्या उपाययोजना कराव्यात असे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले आहे. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक लातूरकरांनी आपल्या आरोग्याच्या हितासाठी जबाबदारीचे भान ठेवून व्यवहार करावेत असे आवाहन कले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलेले होते. मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असून या प्रक्रिया दरम्यानच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या लातूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात असून दिवसागणिक यामध्ये वाढच होवू लागलेली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्वाचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी हा उपाय असला तरी त्याअगोदर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असणार्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहर जिल्हा भाजपाने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या उपाययोजनांमध्ये शहरातील नागरिकांची तपासणी करून त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सज्ज करावी. ही तपासणी टाळेबंदी जाहीर केल्यानंतर चार दिवसांनी सुरू करण्यात यावी. कारण की कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांवर इलाज करणे सहज शक्य होईल. कोरोनावर उपचार करण्यासाठी आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सक्षम आहे की नाही याचा आढावा घेवून हि यंत्रणा सज्ज ठेवावी. त्याचबरोबर यासाठी आवश्यक असणारी आरोग्य उपकरणे व औषधांचाही साठा असावा. स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्यसाठा लोकांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था व्हावी. प्रभागनिहाय किंवा विभागनिहाय जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. फळभाज्यांसाठी तीन दिवसाआड परवानगी द्यावी. कोरोनाच्या काळात काम करणार्या मनपा कर्मचार्यांना पीपीई कीट उपलब्ध करून द्यावे आणि टाळेबंदीच्या काळात शहराच्या सिमा कडक बंद करून शहरा बाहेर अथवा शहरात येण्याची परवानगी देवू नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
टाळेबंदी बाबत प्रशासनाच्यावतीने योग्य तो निर्णय होईल मात्र प्रत्येक लातूरकरांनी आपआपली टाळेबंदी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन शहर जिल्हा भाजपाच्यावतीने करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखत कोरोनाचा ससंर्ग रोखण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी आपल्या जबाबदारीचे भान ठेवूनच व्यवहार करावेत. त्याचबरोबर प्रशासनाच्यवतीने देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करत एका जबाबदार नागरिकाची भुमिका पार पाडणे सध्याच्या काळात प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्यासह आपल्या परिवाराचे व शहराचेही आरोग्य सुरक्षित राहील असा विश्वास देवून शहर जिल्हा भाजपाने कोरोनाचा संसर्ग रोखावा असे आवाहन केले आहे.
या निवेदनावर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, मनपा गटनेते अॅड.शैलेश गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती अॅड.दिपक मठपती, प्रदेश व्यापारी आघाडीचे मनिष बंडेवार, अॅड.दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, विपुल गोजमगुंडे, शशिकांत हांडे, नितीन हसाळे आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.