लातुर जिल्ह्याची बातमी
*नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये*
*लातूर शहर व जिल्ह्यात यापूर्वीप्रमाणेच सर्व आस्थापना व दुकाने सुरू राहतील*
*-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत*
लातूर, दि.2(जिमाका):- उद्यापासून लातूर शहरासह जिल्ह्यात लॉक डाउन जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या आदेशान्वये दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने (अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय औषधी दुकाने नियमितपणे सुरू राहतील) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नियमितपणे सुरू राहणार आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या दिनांक 3 जुलै 2020 पासून इतर कोणत्याही प्रकारचा लॉक डाऊन जाहीर केलेला नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व रस्त्यावर गर्दी करू नये व पूर्वीच्याच लॉकडाऊन प्रमाणे नियमितपणे सर्व आस्थापना सुरू राहणार आहेत याची दखल दखल घ्यावी व समाज माध्यमे व इतर कोणाकडूनही पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
दिनांक:-02 जूलै 2020
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
लातूर, दि.2: (जिमाका)- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दि. 2 जूलै 2020 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते दि. 15 जूलै 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.
या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
दिनांक:-02 जूलै 2020
जिल्हयात सरासरी 8.35 मि.मी. पावसाची नोंद
लातूर दि.2-(जि.मा.का.) जिल्हयात आज दिनांक 02 जूलै 2020 रोजी सकाळी 8 पर्यंत सरासरी 8.38 मिमी पावसाची नोंद झाली असून आज पर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या 28.73 टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हयात दिनांक 02 जूलै 2020 रोजी झालेले तालुका निहाय पर्जन्यमान तसेच 1 जून ते 02 जूलै 2020 पर्यंत झालेले एकूण पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. ( आकडेवारी मि.मी.मध्ये ) लातूर (8.88, 237.92) , औसा (6.00, 195.58) , रेणापूर (13.75, 249.75) ,अहमदपूर (0.00, 271.48) , चाकूर-(7.00, 174.60) , उदगीर-(21.29,232.58),जळकोट-(20.50,242.50),निलंगा-(3.00, 185.94),देवणी- (0.67. 265.02) व शिरुर अनंतपाळ- (2.67, 220.01) मि.मी. आहे.
लातूर जिल्हयाची 1 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 791.60 मि.मी. असून आजपर्यंत झालेला पाऊस 227.44 मि.मी. इतका असून वार्षिक सरासरीच्या 28.73 टक्के आहे.
वृत्त क्र.521 दिनांक:-02 जूलै 2020
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2020
पिक विमा हप्ता भरण्याची 31 जूलै 2020 पर्यंत अंतिम मुदत
लातूर, दि.2: (जिमाका)- खरीप हंगाम 2020 व रब्बी हंगाम 2020-21 पासून 3 वर्षाकरीता राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. लातूर जिल्हृयाकरीता भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई या कंपनीची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केलेली आहे. सदर योजना बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक असून पिक विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतीम मुदत दि.31 जूलै 2020 देण्यात आली आहे. या योजनेत जिल्हयातील सोयाबीन, तूर, मुग, उडीद, बाजरी, ख.ज्वारी, व कापुस या पिकाचा समावेश करण्यात आला आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणे अथवा न होणे बाबत कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमून्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. सदर योजनेमध्ये सोयाबीन, मुग, उडीद ख.ज्वारी, तुर पिकासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातील महसुल मंडळ क्षेत्र (नवीन 60 महसुल मंडळसह) बाजरी सर्व तालुके व कापुस पिकासाठी औसा, निलंगा, शि.अनंतपाळ वगळून इतर सर्व तालुके व अहमदपुर तालुक्यातील सर्व मंडळ अधिसूचित करण्यात आलेली आहेत.
या योजनेअंतर्गत शेतक-यांने भरावयाचा विमा हप्ता दर वा्स्तवदर्शी दराने आकारण्यात आला असुन अन्न्धान्य् व गळीतधान्य् पिकासाठी 2 टक्के व नगदी कापुस पिकासाठी 5 टक्के असा राहील. सदर योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे प्रति हेक्टरी संरक्षित रक्क्म (कंसाबाहेरील आकडे) व शेतक-यांने भरावयाचे विमा हप्ता (कंसामधील आकडे) असेल. जिल्हयातील प्रमुख पिके सोयाबीन-45000/-(रु.900/)-, तुर-35000/-(रु.700), मुग, व उडीद प्रत्येकी 20000/- (रु.400),कापुस-45000/-(रु.2250), ख.ज्वारी-25000/-(रु.500), बाजरी 22000/-(रु.440).
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतक-यांना टाळता न योण्याजोग्या कारणामुळे जसे, पिक पेरणी पासुन, काढणी पर्यंत उत्पादनात विविध कारणामुळे येणारी उत्पादकतेतील घट, प्रतिकूल हवामान घटकामूळे पेरणी/लावणी/उगवण न होणे (असे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या 75% पेक्षा जास्त असल्यास), हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतील झालेली नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पाश्चात नुकसान या बाबीचा समावेश असेल.
अर्जदाराने पिक विमा प्रस्ताव सादर करताना आधारकार्ड /आधार नोंदणीची प्रत 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेला करारनामा/सहमतीपत्र, पेरणी घोषणापत्र आणि बॅक पासबूकाची प्रत सादर करुन प्रत्यक्ष ईलेक्ट्रॉनीक सांक्षांकन करणे बंधनकारक आहे. तसेच आपला मोबाईल क्र. नमूद करुन आधार क्रमांकाचे स्वयं साक्षांकन करणे बंधनकारक आहे. पिक विमा पोर्टलला महाभूलेख संकेतस्थळाचे एकत्रीकरण कार्यान्वयीत झाल्यामूळे विमा पोर्टलवर संबंधीत शेतकऱ्यांच्या जमिन धारणेची पडताळणी होणार असल्याने पुन्हा अर्जासोबत 7/12 उतारा अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही.
याकरीता विमा हप्त्या व्यतिरीक्त सी.एस.सी. केंद्रामार्फत कोणतेही शूल्क घेण्यात येऊ नये. तसे आढळल्यास संबंधीतावर कारवाई करण्यात येईल.
कर्जदार शेतक-यांच्या पिक विमा हप्ता संबंधित बॅकेकडुन तर बिगर कर्जदार शेतकरी जवळच्या प्राधिकृत बॅकेतून, नागरी सुविधा केंद्र (CSC Centre) अथवा स्वत: संकेत स्थळावरुन विमा हप्ता भरु शकतील.
शेतक-यांनी अधिसुचित पिकांसाठी एका क्षेत्रासाठी एकाच वेळी आणि एकाच विमा कंपनीकडुन विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. यामध्ये काही गैरप्रकार निर्देशनास आल्यास सदर क्षेत्राचा विमा हप्ता जप्त् करुन संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.
इच्छुक शेतक-यांना अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात, भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत कार्यरत पिक विमा सुविधा व सल्ला केंद्रामध्ये, नजीकच्या बँकेत किंवा wwwpmfby.gov.in या संकेत स्थळावरून माहिती उपलब्ध् करुन घेता येईल.
शेतक-यांची सदर योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली अंतिम मुदत 31 जुलै 2020 आहे.तसेच कर्जदार शेतक-यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पिक बदलाबाबत सुचना देण्याचा अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापुर्वी 2 कार्यालयीन दिवस अगोदर असेल. आपल्या पिकाचे विमा संरक्षणासाठी नजीकच्या बॅकेत नागरी सुविधा केंद्रात किंवा स्वत: संकेतस्थळाला भेट देऊन पिक विमा संरक्षण घ्यावे असे आवाहन दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.