इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन
औसा=मुख्तार मणियार
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ औसा तहसील कार्यालय येथे काॅग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेसच्या वतीने औसा तहसिलदार मार्फत केंद्र सरकारला आज दिनांक 2 जुलै 2020 गुरुवार रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडण्याची भूमिका केंद्रातील मोदी सरकार घेत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामधील कच्या तेलाच्या किंमती कमी तरी झाल्या त्याचा फायदा लोकांना पोहोचू दिला जात नाही.कोरोनाच्याआपत्कालीन परिस्थितीमध्ये देश संक्रमणाच्या काळातून जात असताना सुध्दा सरकार स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी सर्व सामान्य गोर गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी कोणतीही भूमिका घेत नाही.हेच इंधन दरवाढीतून निष्पन्न होते त्यामुळे देशातील सर्व सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारने तात्काळ इंधनाचे दर कमी करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे केंद्र सरकार कडे केली आहे .
यावेळी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहराध्यक्ष शकील शेख,प्रदेश सचिव अमर खानापूरे,श्रीपती काकडे,उदय देशमुख, नारायण लोखंडे, बाबासाहेब गायकवाड सचीन पाटील,बिरबल देवकते,श्याम भोसले, महेंद्र भादेकर,अॅड.मंजुषा हजारे,शेरखॉ पठाण, शेख गुलाब, सदाशिव कदम बजरंग बाजुळगे, अशोक नाईकवाडे,श्री निवास कुलकर्णी,वहीद खुरेशी,अंगद कांबळे,आदमखॉ पठाण, सय्यद हमीद,संपत गायकवाड,ज्ञानोबा जोगदंड आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.