श्री संत हरिहर महाराज यांच्या अभंगाच्या गाथावर आधारित विजयराव चव्हाण यांच्या हरिहर गाथा या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न
औसा/प्रतिनिधी ः आषाढ शुद्ध एकादशीच्या पर्वकाळावर सद्गुरू श्री हरिहर महाराज यांच्या श्री हरिहर गाथा या ग्रंथाचे प्रकाशन परपूज्य गुरुवर्य गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते नाथ संस्थान औसा येथे करण्यात आले.यावेळी औसेकर महाराज यांनी संत हरिहर बाबा महान योगी होते त्याच्या विषयी आपणाला कायम आदर राहिला आहे,त्यांच्या गाथे च्या ग्रंथाचे प्रकाशन आपल्या हस्ते होत आहे हे माझ्यासाठी भाग्य आहे अशी मनोकामना त्यांनी या वेळी व्यक्त केली. औसा येथील विरनाथ महाराज यांची गादी व हरिहर महाराज यांची गादी आम्ही एकच मानतो. आपण सर्वांनी संतानी दिलेली शिकवण जपली पाहिजे असे गुरूवर्य गुरूबाबा महाराज औसेकर यावेळी म्हणाले.
यावेळी महाराजांनी ग्रंथ प्रकाशना निमित्त लेखक विजयराव चव्हाण यांना आशिर्वाद दिले. या छोटेखानी प्रकाशन सोहळ्याचे सुत्र सचंलन शाम कुलकर्णी यांनी केले. यावेळी बळीराम पानढवळे, दशरथ भगवंतराव जाधव, अविनाश शंकरराव चव्हाण, ज्ञानेश्वर हिगें, दत्ता पवार, अनंत पाटील, हरीश विजयराव चव्हाण, दिपक पानढवळे यांची उपस्थिती होती. आपण आपल्या जीवन कार्यात सतत सत्य आणि संतांच्या कार्याचे अवलोकन करून चालण्याचा प्रयत्न केला. संत हरिदास यांचा मी उपासक त्यांच्या अभंगाने मला कायम प्रभावित केले त्याचे वारंवार अवलोकन केल्यामुळेच आपल्या हातून हे सत्कार्य घडले असून आज आषाढी निमित्त गुरुवर्य श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या आशीर्वचनाने याचे प्रकाशन होत आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना विजय चव्हाण यांनी या प्रकाशनानिमित्त व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.