कासारशिरसी येथील दुरवस्थ रस्त्याची पाहणी अभिमन्यु पवार यांनी केली
औसा=मुख्तार मणियार
औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी कासारशिरसी येथील दुरवस्थ रस्त्याची पाहणी केली.या रस्त्यावर दुरस्थ 9 कोटी 50 लाख खर्चाच्या मंजूरीत होता परंतु कोरोना आजाराचे कारण सांगून महाराष्ट्र शासनाने हा निधी रद्द केला आहे यामुळे हा रस्ता चिखलमय होत असून जागोजागी पाणी साठत आहे निंलगा-उमरगा रोड गेला आहे त्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अनेकांनी घराचे बांधकाम केले आहे.या अतिक्रमणामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे त्याकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.कासारशिरसीतील विस्तारीत सार्वजनिक नळाचा पाणीपुरवठा सुलभ व्हावा ग्रामपंचायत सरपंच संजीव गोला यांनी आमदार अभिमन्यु पवार यांच्याकडे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.