औशाचे तहसिलदार शोभा पूजारी यांची चाचणी निगेटिव्ह




औशाचे तहसिलदार शोभा पूजारी यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने पुन्हा फिल्डवर
 औसा मुख्तार मणियार
औशातील एका तलाठ्याला कोरोनाची लागण झाल्याने औशाच्या तहसीलदार शोभा पुजारी  व अन्य काही कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता .शुक्रवार दि १७ जूलै रोजी तहसीलदारांची  कोरोना चाचणी करण्यात आली . या चाचणीचा रिपोर्ट मध्यरात्री उशिरा आला . ही  कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने प्रशासनातील अनेकांचा जीव भाड्यात पडला आहे .आपला अहवाल निगेटिव्ह येताच तहसीलदार शोभा पुजारी यांनी आज  शनिवार दि १८ जुलै रोजी   सकाळी पुन्हा नव्या दमाने तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या .गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ , तालुका आरोग्य अधिकारी डाॕ .आर आर शेख यांच्यासह श्रीमती पुजारी यांनी नांदुर्गा , लामजना , तपसे चिंचोली ,  कोरंगळा या गावांना भेटी देवून तेथील कंटेन्मेंट झोनची ( प्रतिबंधित क्षेत्र  ) पाहणी केली आहे . लिंबाळा दाऊ येथील ACF ची पाहणी केली .   आपल्या चिमुकल्या  मुलींस घरी सोडून कर्तव्य बजावण्यास घराबाहेर पडलेल्या या महिला  तहसीलदारांचे  प्रशासनातील अनेकांनी कौतुक व अभिनंदन केले आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या