बॉलिवूडच्या ‘नृत्यगुरू‘ हरपल्या
- अमित विलासराव देशमुख
मुंबई दि. ३ :
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक प्रसिद्ध गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सरोज खान यांच्या नुत्य शिकवणीमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे करिअर झालं आहे. सरोज खान यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेमाचा नृत्यगुरू कायमचा हरपला अशी भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त आहे.
श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सुरवातीच्या काळात चित्रपटात नृत्यदिग्दर्शन यासाठी फक्त पुरुष दिग्दर्शकाचा विचार केला जायचा, त्या काळात सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले. त्यांच्यामुळेच आज वेगवेगळ्या चित्रपट पुरस्कारांमध्ये नृत्यदिग्दर्शकाला ही त्याच्या कामासाठी नावाजले जाऊ लागले. मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नागीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिक, कलंक या चित्रपटांसाठी त्यांनी केलेले नृत्यदिग्दर्शन आपल्या सर्वांच्या मनात कायम लक्षात राहील. सरोज खान यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.