लाचेची मागणी बिडिओ ग्रामसेवकावर गुन्हा
औसा:(प्रतिनिधी) उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मध्यस्थीने हेर कुमदाळ येथील झाले विकास कामाचे तीन लाखांचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केली. दहा हजार रुपयांची लाच मागिणी केल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात उदगीर शहर पोलिस ठाण्यात आज दि. १५ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार देवून गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी कुमदाळ ग्रामीण पंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या मोटारीचे बिल व अंगणवाडी साहित्याची खरेदीच्या बिलावर सही करण्यासाठी व या आगोदर काढण्यात आलेल्या बिल असे एकुण तीन लाखाच्या बिलाचे दोन टक्के प्रमाणे पैशाची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास याची माहिती दिली. त्यानुसार २ जुलै रोजी याप्रकरणाची लाचलुचपत विभागाने चौकशी करून पुरावे गोळा केले. सदर लाचेची रक्कम गटविकास अधिकारी चव्हाण यांना देण्यासाठी दि. ३ जचलै रोजी तक्ररादार पंचासमक्ष पंचायत समिती गेले असता गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सदर रक्कम ग्रामसेवकास देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दि. ४ जुलै रोजी पंचायत समिती येथे ग्रामसेवक प्रल्हाद सुर्यवंशी हे सदर रक्कमेची मागणी करीत. गटविकास अधिकारी चव्हाण साहेबांनी मागणी केलेल्या दहा हजार रुपये द्या ती रक्कम मी साहेबांना देतो म्हणत लाचेच्या रक्कमेचा स्विकार केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणाची सखोल चौकशी करीत सर्व पुरावे गोळा करून पुराव्याच्या आधारे उदगीर शहर पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत विभागाच्या पथकात श्री. दराडे यांच्यासह पोलिस उपाधीक्षक iबेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, मोहन सुरवसे, रूपाली भोसले, शिवा कच्छवे, आशिष क्षीरसागर, महाजन आदींचा समावेश होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.