सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत 95 % पेक्षा अधिक गुण घेणारे राजा नारायणलाल लाहोटी स्कूलचे -12 विद्यार्थी

सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत 95 % पेक्षा अधिक गुण घेणारे राजा नारायणलाल लाहोटी स्कूलचे -12 विद्यार्थी

--स्कुलचा याहीवर्षाचा निकाल 100%

--स्कूलमधून राजनंदिनी धाराशिवे प्रथम तर प्रांजल खटोड द्वितीय

लातूर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)  च्या वतीने मार्च-2020 मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून  दहावी बोर्ड परिक्षेमध्ये राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवुन स्कूलचा यशाची परंपरा कायम राखत सलग आठव्या वर्षीही स्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
एकूण 68 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी राजनंदिनी धाराशिवे-98,  प्रांजल खटोड-97, गणेश गलबले-97, आभा चलवदे-96. 80, सायली खोसे-96.60, आदिती सूर्यवंशी-96,  वैष्णवी कुलकर्णी-96,  मुकुंद  करवा-95. 80, वेदश्री पाठक 95.60,  आदित्य जाधव-95.40, जीनीका बिसेन-95.20 यश भुतडा-94.60 या 12 विद्यार्थ्यांनी 95%  पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. स्कूलचे एकूण सत्तावीस विद्यार्थी 90 ते 95%,  पंधरा विद्यार्थी 80 ते 90%,  दहा विद्यार्थी 70 ते 80%  दरम्यानचे गुण मिळविणारे आहेत. स्कूलच्या एकूण सात विद्यार्थ्यांनी गणित विषयात शंभर पैकी शंभर मार्क मिळविले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,  संस्था अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव एडवोकेट आशिष बाजपाई, स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी,  प्राचार्य कर्नल एस ए वरदन, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपानी,  सहउपाध्यक्ष दिनेशकुमार ईनाणी, सहसचिव शरदकुमार नावंदर,  संयुक्त सचिव एडवोकेट लक्ष्मीकांत करवा,  कोषाध्यक्ष ईश्वर प्रसाद डागा, हुकूमचंद कलंत्री, कमलकिशोर अग्रवाल, संजय भराडीया, संजय बांगड,  शांतीलाल कुचेरिया, आशिष अग्रवाल,  डॉ अनिल राठी,  श्यामसुंदर भार्गव, जुगलकिशोर उपाध्याय, रजिस्ट्रार प्रविण शिवणगीकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या