कोवीड१९ तपासणी बाबत खाजगी डॉक्टरांना येत असलेल्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश..
इंडियन मेडिकल असोसिएशन संस्थेने यापूर्वीच कोवीड १९ उपचारासाठी डॉक्टर्सनी कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत त्या तत्त्वांचा वापर करून जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी रुग्णावर उपचार सुरू करण्या बाबत तात्काळ आपल्या रुग्णालयात सुविधा निर्माण कराव्यात. तसेच जे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करणार आहेत त्याची यादी सात दिवसात आयएमए नी तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर करावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोवीड१९ च्या अनुषंगाने तसेच खासगी रुग्णालयातून कोविंड रुग्णावर उपचार सुरू करण्या बाबतच्या आढावा बैठकीत सांगीतले आहे.
खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करत असताना रॅपिड टेस्टद्वारे रुग्णांची तपासणी करावी. ह्या टेस्ट साठी शासकीय दराने मोबदला अदा करावा. लातूर महापालिकेच्या वतीने लवकरच रॅपिड टेस्ट किट उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत साथरोग प्रयोगशाळेचे दैनंदिन तपासणी करण्याची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कन्टेन्टमेंट झोनमध्ये पूल टेस्टिंग प्रायोगिक तत्त्वावर करण्यास सुचित करण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले.
या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, IMA चे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्यासह अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.
*अमित विलासराव देशमुख*
*(वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र* *राज्य तथा पालकमंत्री लातूर )*

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.