राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे
दोन महिन्याचे मानधन एकत्रितपणे अदा
- अमित विलासराव देशमुख
मुंबई, दि. १५
राज्यातील सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत व साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरमहा अदा करण्यात येणाऱ्या मानधनापैकी मार्च व एप्रिल महिन्यांचे मानधन एकत्रितपणे अदा करण्यात आले असून येत्या आठवड्याभरात ते संबंधितांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे सांस्कतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
राज्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना १९५५ - ५६ पासून अ, ब व क या वर्गीकरणानुसार मासिक मानधन दिले जाते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, उर्वरित मानधनसुद्धा लवकरात लवकर एकत्रितपणे अदा करण्याची विनंती वित्त विभागाला करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग कलाकारांच्या अडचणी जाणून त्यांच्या पाठीशी यापुढेही समर्थपणे उभा राहील आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.
------------------------

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.