उदयोग भवन परीसराचा प्रश्न मार्गी लावा उद्योग भवन परीसर व औद्योगिक वसाहतमधील व्यवसायीक व नागरीकांचे प्रश्न आहेत ते समजून घ्यावेत त्यातून सन्मानीय तोडगा काढण्या संबंधी प्रस्ताव तयार करून पाठवावा अशी सुचना केली





*उदयोग भवन परीसराचा प्रश्न मार्गी लावा*
     उद्योग भवन परीसर व औद्योगिक वसाहतमधील व्यवसायीक व नागरीकांचे प्रश्न आहेत ते समजून घ्यावेत त्यातून सन्मानीय तोडगा काढण्या संबंधी प्रस्ताव तयार करून पाठवावा अशी सुचना केली. 
मनपा मालकीच्या गाळेधारकांची समस्या सोडवा
लातूर महानगर पालीका मालकीच्या व्यापारी संकंलात गाळे धारकांच्या भाडेवाढीची समस्या बरेच दिवसा पासून प्रलंबीत आहे. महापालीकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी या गाळे धारकांच्या शिष्टमंडळा सोबत बसुन एक आठवडयच्या आत तोंडगा काढावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 
     सोमवार दिनांक ६ जुलै रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात लातूर महानगरपालीकेचे पदाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत शहरात वाढत चाललेल्या कोविड १९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील सध्याची कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थिती, मनपा कडून करण्यात येणाऱ्या उपाय योजना, कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा यासह अनेक विषयाची माहिती घेतली व त्यानंतर काही महत्वपुर्ण सुचना केल्या. 
या बैठकीस लातूर महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समीती सभापती दीपक मठपती, विरोधी पक्ष नेते दिपक सुळ, परीवहन सभापती बीरजदार व आयुक्त देविदास टेकाळे, मनपा उपआयुक्त लता फड, सहआयुक्त श्रीमती गुरमे, श्रीमती डाके, बंडू किसवे, संजय कुलकर्णी, समाधान सुर्यवंशी, प्रदीप चिद्रे, श्री.काझी, श्री. ताकपिरे यांच्यासह लातूर मनपा मधील आरोग्य, स्वच्छता यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
                       *अमित विलासराव देशमुख*
*(वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र* *राज्य तथा पालकमंत्री लातूर )*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या