औशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क
प्रतिनिधी मुख्तार मणियार औसा
पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या काळात दि.२१ जुलै ते २४ जुलै २०२० या कालावधीत थोडीशी शिधिलता दिल्याने औशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे . पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर आणि उपनिरीक्षक राहुल बहूरे यांच्या मार्गदर्शनाखाली औसा बस स्थानक परिसरात नागरिकांनी विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी मोटारसायकल वरून फिरणा-यांना दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उगारुन गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.दि.२२ जुलै रोजी भाजीपाला विक्रेत्यांना हातगाड्या वरुन गल्ली बोळात भाजी विकायचे आदेश पालिकेने दिले असून किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानाचे अर्धे शटर उघडून सेवा देण्यात येत आहे.दुपारी १२ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची सेवा देण्यात येत आहे.औषध विक्रेत्यांनी वैळेचे बंधन घातले असून दवाखान्या शेजारील मेडिकल स्टोअर्सला सवलत देण्यात आली आहे.कृषी सेवा केंद्रासमोर मात्र शेतकरी गर्दी करीत असून सोशल डिस्टंसिग नियमांचे उल्लंघण करीत असल्याने पालिका व पोलिस प्रशासनाला लोकांना आवरताना त्रास होत आहे.औसा शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे कांन्टेन्मेट झोनमधील परिसर सील करुन आरोग्य विभागाकडून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे.औसा शहरात सध्या पोलीस प्रशासनाने मात्र चांगल्या पद्धतीने काम करित असल्याचे दिसत आहे.शहर व ग्रामीण भागातील जनतेनेही कोरोना विषाणूचा व्हाट्सप अप प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे आणि कामा व्यतीरिक्त घराबाहेर एकाच व्यक्तीने तोंडाला मास्क बांधून बाहेर पडावे.बाहेरुन घरात आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून आरोग्य सेतू प नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.