महापौर थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या भेटीस
कोरोना रुग्णांना प्रत्यक्ष भेटून महापौर गोजमगुंडे यांनी केली विचारपूस
डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेला महापौरांचा सलाम
शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.या रुग्णांसह जिल्ह्यातील रुग्ण लातूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आज मंगळवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान केंद्र येथे भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांच्या कार्याला सलाम केला.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. लातूर शहरासह जिल्हा प्रारंभी कोरोनामुक्त होता परंतु नंतर रुग्णसंख्या वाढली.त्यामुळेच बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात लॉकडाऊन केले जाणार आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे परंतु या रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करण्याचे काम डॉक्टर्स आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी करत आहेत.महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मंगळवारी सायंकाळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञानकेंद्रास भेट दिली.तेथील डॉक्टरांच्या सूचनेनुसार सुरक्षेचे निकष पाळत त्यांनी थेट उपचार सुरू असणाऱ्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. पीपीई किट परिधान करून रुग्णांना ते भेटले.उपचार कसे सुरू आहेत? काही समस्या आहेत काय ?यासंदर्भात रुग्णांना विचारणा केली. सर्वच रुग्णांनी वैद्यकीय उपचार बाबत समाधान व्यक्त केले.
कोरोनावर उपचार घेत असताना वैद्यकीय उपचारासोबतच मानसिक आधाराची गरज असते. महापौर गोजमगुंडे यांनी रूग्णांना भेटून त्यांना मानसिक पाठबळ दिले.
कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर्स व आरोग्य सेवक खऱ्या अर्थाने देवदूत आहेत. महापौर गोजमगुंडे यांनी या भेटीत सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सर्वजण कोरोना रुग्णावर उपचार करत आहेत. कोरोना रुग्णांना जीवदान देत आहेत.या सेवेतील प्रत्येकाचे महापौरांनी आभार व्यक्त केले.२४ तास घरदार सोडून कार्यरत असणाऱ्या या मंडळींचे आभार व्यक्त करणे कृतघ्नपणाचे ठरेल. या विभागातील प्रत्येक कर्मचार्याच्या कार्याला सलामच केला पाहिजे,असेही गोजमगुंडे यांनी यावेळी म्हटले.
याठिकाणी नेमके कसे उपचार केले जातात त्याची माहिती त्यांनी डॉक्टरांकडून घेतली.रुग्ण दाखल झाल्यापासून त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत काय काय प्रक्रिया होते? उपचाराची पद्धत कशी असते ?रुग्णांना कोणता आहार दिला जातो? याचीही माहिती महापौरांनी यावेळी घेतली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान केंद्रामध्ये आतापर्यंत शेकडो रुग्णावर उपचार करण्यात आले.बहुतांश रुग्ण उपचारानंतर घरी गेले, आज ते सामान्य जीवन जगत आहेत. अशा रुग्णांना दूरवरून शुभेच्छा देणारे अनेकजण आहेत परंतु प्रत्यक्ष भेट देणारे महापौर गोजमगुंडे हे पहिलेच लोकप्रतिनिधी ठरावेत.स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधला.
रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश दूर करती है






0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.