औसा नगरपालिकेतील कर्मचा-यांचे वेतन थकले




औसा नगरपालिकेतील कर्मचा-यांचे वेतन थकले
औसा मुख्तार मणियार
औसा नगरपालिकेतील कर्मचारी व सफाई कामगाराचे वेतन मार्च पासून आजपर्यंत न झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता पलिकेची सेवा बजावत आहेत.याकडे नगरपालिका प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेतील कर्मचारी सकाळ पासून ते रात्रीपर्यंत नालेसफाई पासून ते विलगिकरण कक्षाचे निर्जंतूकीकरण,विना मास्क फिरणा-यावर कार्यवाही अशी विविध कामे करीत असतात.मात्र त्यांचे वेतन थकल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे.मासिक वेतन नसल्याने बहुतांश कामगारांना उसनवारीवर संसाराचा गाडा चालवावा लागत आहे.मात्र आन्य अडचणी सोडविताना मोठी कसरत होत आहे.त्यामुळे कर्मचा-यांतून संताप व्यक्त होत आहे.तात्काळ वेतन द्यावे अशी मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या